logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

महापराक्रमी वीर योद्धा महाराणा प्रताप यांची जयंती जय भवानी ट्रस्ट,काची आळी,शिरूर तर्फे साजरी.

पुणे जिल्हा रिपोर्टर.09 मे रोजी महाराणा प्रताप यांची जयंती साजरी केली जाते. महान राजपूत योद्धा मेवाडचे शासक आणि मुघल साम्राज्याला कडवी टक्कर देणारे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी कुंभलगड किल्ल्यावर झाला. यावर्षी 2026 मध्ये त्यांची 486 वी जयंती साजरी होत असून देशभरात विशेषता राजस्थान आणि महाराष्ट्राच्या त्यांच्या शौर्याचे स्मरण केले जात आहे.
महाराणा प्रताप जयंती 2026 महत्त्वाचे मुद्दे.

जयंती तारीख 9 मे इंग्रजी दिनदर्शिका नुसार
जन्म 9 मे 1540 कुंभलगड किल्ला राजस्थान
पूर्ण नाव- महाराणा प्रताप सिंग गोहीलोत
पालक- वडील महाराणा उदयसिंग आणि अहिराणी जयवंत कंवर
प्रसिद्ध युद्ध 1576 ची हळदी घाट ची लढाई जिथे त्यांनी अकबरांच्या सैन्याशी झुंज दिली.

प्रतिमा पूजन. जय भवानी ट्रस्ट, काची आळी, शिरूर नगरपरिषद विद्यमान नगरसेविका श्रीमती. संगीता महेंद्र मल्लाव, श्री. शंतनू महेंद्र मल्लाव, श्री. अविनाश जी मल्लाव अध्यक्ष मल्लाव समाज ( राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष ) श्री. अनिल जी मल्लाव ( भारतीय जनवादी पार्टी ) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माजी सैनिक मनाजी भगवंत बोऱ्हाडे, महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव श्री योगेश बापूराव डोळस, तालुका कोषाध्यक्ष रोहित मल्लाव, श्री. प्रकाश दत्तात्रय चौधरी, रुपेश हुडे,पुणे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जी मल्लाव, सामाजिक कार्यकर्ते मंगेश जी मल्लाव, श्री. अरविंद कुमार राठोड, दिनेश राठोड ,राजेंद्र नेमीचंद राठोड, जय भवानी ट्रस्ट शिरूर उपाध्यक्ष श्री. अमित शरद मल्लाव जय भवानी ट्रस्ट सदस्य व पदाधिकारी व इतर यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजनाने जयंती साजरी.

प्रेरणास्थान = महाराणा प्रताप हे स्वाभिमान शौर्य आणि मातृभूमी प्रेमाचे प्रतीक म्हणून स्मरले जातात.
महाराणा प्रताप यांच्या बद्दल खास गोष्टी.
त्यांना लहानपणी कीका नावाने संबोधले जायचे.
ते सिसोदिया घराण्यातील होते आणि त्यांनी मेवाड च्या स्वाभिमानासाठी मुघलांशी आयुष्यभर संघर्ष केला.
त्यांचे अफाट पराक्रमामुळे त्यांना वीर शिरोमणी म्हटले जाते. महाराणा प्रताप जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

18
1308 views

Comment