कविता मोडीचे सरकार
कविता
मोडीचे सरकार
(सन २०१४ च्या राजकीय परिवर्तनापासून आजच्या वास्तवापर्यंतचा प्रवास)
मोदींची हवा नव्हती, नाही म्हणणाऱ्यांनीच हवा केली ।
विनाकारण काहीही म्हणा, काँग्रेस मात्र संपवायची होती ॥१॥
राजे गेले, रजवाडे गेले, परक्यांचे घोंगडेही गेले ।
स्वातंत्र्याची पहाट उगवता, संस्थानिक काँग्रेसची चांदी झाली ॥२॥
पण नियती ही नियती असते, तिच्या मनात काही वेगळे असते ।
दृष्टीआड असलेला एक निश्चल तारा, सर्व काही दूरून पाहत होता ॥३॥
मतांचे राजकारण काँग्रेसचे, धर्मरक्षणाचे राजकारण भाजपचे ।
समतेचे राजकारण सपा-बसपाचे, विनाकारण राजकारण समाजवाद्यांचे ॥४॥
मतांपायी काँग्रेस हरली, आरक्षणापायी सपा-बसपाही गेली ।
आप ने जोरदार प्रवेश केला, पण गणित बिघडता स्वतःच हरवली ॥५॥
गणिते ही गणितात असतात, कुठे बेरीज तर कुठे वजाबाकी ।
गुणाकार कधी, भागाकार कधी; न सुटलेले राजकारण म्हणजे बीजगणित बाकी ॥६॥
झाले गेले विसरून जा, पुन्हा सर्वांनी कामाला लागा ।
अच्छे दिन आने वाले हैं, म्हणत नवे सरकार पुढे सरसावले ॥७॥
जातीभेद, धर्मभेद विसरा, गोधरा, मंडल-कमंडलही विसरा ।
सर्व काही विसरलात तरी, माझ्या भीमाला मात्र विसरू नका ॥८॥
आकाशवाणी झाली जणू, जाती-धर्माची लढाई संपणार ।
विषमता जाऊन समता येईल, असा नवा संदेश घुमणार ॥९॥
सबको राम, सबको काम, सबका साथ, सबका विकास ।
या घोषणांनी भारावून गेला, नवभारताचा प्रत्येक श्वास ॥१०॥
स्वप्नांचा जादूगार म्हणे, भारताला नंबर वन करणार आहे ।
अमेरिकेपुढे नसलो तरी, चीनपुढे निश्चित नेणार आहे ॥११॥
दहा वर्षांचा काळ सरला, जनता आता हिशोब मागत आहे ।
घोषणांच्या त्या गर्दीमध्ये, वास्तव कुठे धावत आहे ॥१२॥
रस्ते झाले, पूल उभे राहिले, डिजिटल भारत पुढे गेला ।
पण बेरोजगार तरुणांच्या डोळ्यात, प्रश्न अजूनही तसाच राहिला ॥१३॥
मोफत धान्य, घरकुल, योजना गावोगावी पोहोचल्या ।
तरी शेतकऱ्यांच्या घामामधल्या, वेदना पूर्ण न मावळल्या ॥१४॥
राममंदिराचे स्वप्न पूर्ण झाले, भक्तांच्या भावना फुलल्या ।
पण धर्माच्या नावाखाली, मनामनांत भिंती उभ्या राहिल्या ॥१५॥
कोणी म्हणे विश्वगुरू भारत, कोणी म्हणे लोकशाही धोक्यात ।
सत्य कुठे आणि असत्य कुठे, जनता उभी द्विधा मनात ॥१६॥
माध्यमांची भाषा बदलली, प्रश्न विचारणे गुन्हा ठरला ।
जयजयकाराच्या गर्दीमध्ये, सामान्य माणूस हरवून गेला ॥१७॥
आरक्षण, संविधान, समता, पुन्हा चर्चेच्या केंद्रात आली ।
बाबासाहेबांच्या विचारांची, नव्या पिढीला आठवण झाली ॥१८॥
जात अजून जिवंत आहे, धर्म अजून राजकारणात आहे ।
समतेच्या त्या बेगमपुराचा, रस्ता अजून शोधात आहे ॥१९॥
ना अंध विरोध, ना अंध समर्थन, जनता आता जागी झाली ।
काम कुणाचे, दोष कुणाचे, विचारण्याची वेळ आली ॥२०॥
भारत माझा मोठा व्हावा, विज्ञानाने जग जिंकावे ।
पण संविधानाच्या सावलीतच, स्वातंत्र्याचे फूल फुलावे ॥२१॥
अच्छे दिनच्या स्वप्नामधुनी, अनुभवांचे ढग सरले ।
जनतेच्या न्यायाच्या दरबारात, आता प्रश्न नवे उभे राहिले ॥२२॥
सत्ता येती, सत्ता जाती, इतिहास मात्र साक्षी राहतो ।
जनतेच्या मनातील राजा, कर्मानेच मोठा ठरतो ॥२३॥
लोकशाहीच्या या भूमीत, मतदारच खरा जनार्दन आहे ।
दिल्लीच्या प्रत्येक सिंहासनावर, जनतेचाच अंतिम निर्णय आहे ॥२४॥
कवी : अण्णा दवणकर
संक्रापूर, ता. राहुरी, जि. अहमदनगर
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015