सीएसएमटी कसारा लोकल सेवा बंद अनेक मेल एक्सप्रेस गाड्या विलंबाने धावणार कसारा घाटात विशेष वाहतूक आणि पावर ब्लॉक
शहापूर साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कसारा इगतपुरी खर्डी विभागामध्ये ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचइ) संदर्भातील अडथळे दूर करण्यासाठी कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांसाठी १०, ११ मे रोजी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, सीएसएमटी कसारा थेट लोकल सेवा बंद असेल. तसेच मेल-एक्स्प्रेस वाहतुकीच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १० आणि ११ मे रोजी दुपारी ३.५० ते सायंकाळी ५.५० या वेळेत इगतपुरी खर्डी दरम्यान अप आणि डाऊन मुख्य मार्गावर दोन तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत कसारा मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत.
लोकल सेवांवर परिणाम
सीएसएमटीवरून कसाऱ्याकडे जाणाऱ्या काही लोकल अंशत: रद्द करण्यात येणार आहेत.
सीएसएमटीहून अनुक्रमे दुपारी १.१०, २.१७ आणि २.४६ वाजता सुटणाऱ्या कसारा लोकल आसनगावपर्यंतच चालवण्यात येतील.
कसाऱ्यावरून सीएसएमटीकडे येणाऱ्या काही लोकल आसनगाव येथून पुढे सुटतील.
कसारा सीएसएमटी लोकल (कसारा सुटण्याची वेळ दुपारी ३.३५) आसनगावहून दुपारी ४.१२ वाजता सुटेल.
कसारा सीएसएमटी लोकल (कसारा सुटण्याची वेळ दुपारी ४.१६) आसनगावहून दुपारी ४.५४ वाजता सुटेल.
कसारा सीएसएमटी लोकल (कसारा सुटण्याची वेळ सायंकाळी ५.०२) आसनगावहून सायंकाळी ५.३९ वाजता सुटेल.मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन
ब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात येतील.
गाडी क्रमांक १२१४३ लोकमान्य टिळक टर्मिनस सुलतानपूर एक्स्प्रेस १० मे रोजी टिटवाळा येथे दुपारी ४.४८ ते सायंकाळी ५.०६ दरम्यान थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक १५०६६ पनवेल गोरखपूर एक्स्प्रेस ११ मे रोजी टिटवाळा येथे त्याच वेळेत थांबवण्यात येईल.
गाडी क्रमांक ११०७१ एलटीटी बलिया कामायनी एक्स्प्रेस दोन्ही दिवशी खर्डी येथे दुपारी ३.२८ ते सायंकाळी ६ दरम्यान थांबवण्यात येईल.
गाडी क्रमांक १३२०२ एलटीटी राजगीर एक्स्प्रेस आटगाव येथे दुपारी ४.२४ ते सायंकाळी ६.०२ दरम्यान थांबवण्यात येईल.
गाडी क्रमांक १२१३९ सीएसएमटी नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस खडवली येथे दुपारी ४.२० ते सायंकाळी ५.४० दरम्यान थांबवण्यात येईल.
गाडी क्रमांक २२२२१ सीएसएमटी हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस खर्डी येथे सायंकाळी ५.३० ते ६.५० दरम्यान थांबवण्यात येईल.