बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना! पोटच्या दोन्ही पोरींवरही केले लैंगिक अत्याचार
शहापूर साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
डोंबिवलीतील बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फसणारी एक घटना उघडीस आली आहे आपल्या दोन संख्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका नराधम बापाला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे डोंबिवलीतील पूर्वेतील मानपाडा परिसरात राहणाऱ्या एका 45 वर्षीय व्यक्तीला दोन मुली आहेत तो कोणताही काम धंदा करीत नाही तर त्याची पत्नी मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते कामानिमित्त पत्नी बाहेर असल्याने या संधीचा फायदा घेऊन विकृत बाप आपल्या 19 वर्षीय मोठ्या मुलीवर गेल्या काही महिन्यापासून लैंगिक अत्याचार करत होता मात्र याबाबत घाबरलेल्या मुलीने आईला अथवा कुणालाही माहिती दिली नाही त्यामुळे विकृत बापाचे मनोधैर्य वाढत चालले होते पोटच्या पोरीवर हा विकृत अत्याचार करत होता गेल्या अनेक महिन्यापासून मोठी मुलगी पित्याकडून होणाऱ्या अत्याचार सहन करत होती त्यानंतर या नराधम पित्याची मजल आणखीनच वाढली त्यांनी त्याच्या दहा वर्षीय मुलीवर देखील अत्याचार सुरू केल. मोठ्या बहिणीने या विरोधात आवाज उठून घडल्या प्रकार आपल्या आईला सांगितला हे ऐकून आईच्या पायाखालची वाळू सरकली तिने लागलीच मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या विकृत पतीच्या विरोधात कैफियत मांडली पोलिसांनी सदर महिलेसह तिच्या दोन्ही मुलींची विचारपूस करून धीर दिला त्यानंतर विकृत नराधम पित्याच्या विरोधात पिढीत मुलीच्या फिर्यादीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला मानपाडा पोलिसांनी घटनेचे गांभीरे ओळखून नाराधाम पित्याला बेड्या ठोकल्या आहेया घटनेमुळेसर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.