logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पिंपळनेर : दुर्दैवी अपघातात समीर सोनू पवार यांचा मृत्यू

पिंपळनेर : साक्री- पिंपळनेर हायवेवरील सामोडा पेट्रोल पंपाजवळ आज एक दुर्दैवी अपघात झाला. समीर सोनू पवार हे त्यांच्या KTM दुचाकीवरून पिंपळनेरकडे जात असताना समोरच्या वाळू वाहतूक करणाऱ्या डम्परला जोरदार धडक बसली.

या भीषण अपघातात समीर सोनू पवार, गाव शिव बफखेल, जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून हायवेवरील वाढत्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

276
11847 views

Comment