logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जिद्द आणि चिकाटीचे फळ! पाथर्डीच्या शिरपेचात मानाचा तुरा; घिसाडी समाजाचा तरुण बनला IFS अधिकारी

पाथर्डी (प्रतिनिधी):

कष्टाच्या जोरावर आभाळाला गवसणी घालता येते, हे पाथर्डीतील एका सामान्य कुटुंबातील तरुणाने सिद्ध करून दाखवले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) घेण्यात आलेल्या भारतीय वन सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यात पाथर्डी शहरातील अक्षय हरीभाऊ पवार याची भारतीय वन सेवा अधिकारी (IFS) पदी निवड झाली आहे.

शहरातील वीर सावरकर मैदान परिसरातील रहिवासी असलेल्या अक्षयने वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी हे देदीप्यमान यश संपादन केले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि घिसाडी समाजासारख्या कष्टकरी समाजातून पुढे येत त्याने मिळवलेले हे यश समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

आज सायंकाळी यूपीएससीचा निकाल जाहीर होताच अक्षयच्या निवडीची बातमी पाथर्डी शहरात वाऱ्यासारखी पसरली. एका सामान्य घरातील मुलगा आता थेट 'क्लास वन' अधिकारी म्हणून देशाची सेवा करणार असल्याने सर्वत्र अभिमानाने चर्चा होत आहे. अक्षयच्या या यशाबद्दल त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अक्षयने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि शिक्षकांना दिले आहे. जिद्द, चिकाटी आणि योग्य नियोजनाच्या जोरावर कोणत्याही मोठ्या ध्येयाला गवसणी घालता येते, असे अक्षयच्या निवडीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्याच्या या निवडीमुळे पाथर्डी तालुक्याच्या नावलौकिकात मोठी भर पडली आहे.

8
1148 views

Comment