logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*नूतन कन्या शाळेची अंजली काळे जिल्ह्यात प्रथम* जिल्ह्याचा निकाल ८५.७८ टक्के, यंदाही मुलीच सरस

*नूतन कन्या शाळेची अंजली काळे जिल्ह्यात प्रथम*
जिल्ह्याचा निकाल ८५.७८ टक्के, यंदाही मुलीच सरस

विलास केजरकर भंडारा

भंडारा,:- शुक्रवार दिनांक ८ मे ला घोषित एसएससी बोर्ड परीक्षेच्या निकालांत नूतन कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी परत एकदा आपले वर्चस्व कायम ठेवत जिल्ह्यात प्रथम तीनही क्रमांक नूतनच्या विद्यार्थिनींनी पटकाविले आहेत. अंजली सुनील काळे हिने 500 पैकी 497 गुण प्राप्त करत 99.40 टक्क्यांसह जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान प्राप्त केला असून वैनगंगा विद्यालय पवनी येथील श्रावणी राजेंद्र ठोंगसे हिने 97.80 गुण प्राप्त करत जिल्ह्यात दुसरी येण्याचा मान मिळविला तसेच हयासिंथ हाय स्कूल लाखनीच्या मेहुल पटले याने 97 टक्के गुणांसह जिल्ह्यात तृतीय स्थान प्राप्त केले आहे.

*यंदाही मुलींनी मारली बाजी*

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने शुक्रवार ८ मे ला माध्यमिक शालांत परीक्षेचे निकल जाहीर केले असून भंडारा जिल्ह्याचा निकाल 85.78 टक्के लागला असून नागपूर विभागात सह जिल्ह्यांमध्ये भंडारा जिल्हा पाचव्या पायरीवर आहे. जिल्ह्यातून एकूण 15460 विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षेसाठी नोंदणी केली होती त्यापैकी 15396 परीक्षेला प्रविष्ट झाले ज्यात एकूण 13207 परिक्षार्थी उत्तीर्ण झाले असून 2123 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर 4099 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही शालांत परीक्षेत मुलींनी बाजी मारली असून मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी (91.84%) मुलांपेक्षा (80.09%) अधिक आहे.

*नूतन कन्या शाळेचा बंपर निकाल*

उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत उत्कृष्ट निकाल दिल्यानंतर माध्यमिक शालांत परीक्षेत सुद्धा नूतन कन्या शाळेने आली गुणवत्ता सिद्ध केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 309 विद्यार्थिनी नूतन कन्या शाळेतून प्रविष्ट झाल्या होत्या त्यापैकी 308 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकल 99.67 टक्के आहे. तब्बल 131 विद्यार्थिनींनी प्राविण्य श्रेणी प्राप्त केली असून 25 विद्यार्थिनींनी 90 टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहे. नूतन कन्या शाळेच्या लावण्या खंदाडे हिने 96.40 गुण प्राप्त केले असून शाळेत दुसरी आणि उत्कर्षा पराते हिने 96.20 गुण प्राप्त करत तिसरी येण्याचा मान मिळविला.

*लाखनी तालुका आघाडीवर, लाखांदूर तालुक्याची पीछेहाट*

तालुका निहाय निकालात लाखनी तालुक्याने पहिला क्रमांक प्राप्त केला असून तालुक्याची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 89.70 टक्के आहे. त्यापाठोपाठ भंडारा तालुका 89.36 टक्के, पवनी तालुका 87.66, मोहाडी तालुका 84.75, साकोली 84.22, तुमसर 82.70 तसेच लाखांदूर तालुका 80.19 टक्के आहे.

*मराठी पेक्षा इंग्रजी सरस*

यंदाच्या बारावी बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजी हा किलर सब्जेक्ट ठरला होता पान माध्यमिक शालांत परीक्षेत सर्वच भाषविषयांपेक्षा इंग्रजी (प्रथम भाषा) हा विषय सरस ठरला असून इंग्रजी प्रथम भाषेचा निकाल 98.88 टक्के लागला असून इंग्रजी तृतीय भाषेचा निकाल 89.49 टक्के लागला आहे. त्या तुलनेत मराठी प्रथम भाषेचा निकाल सर्वांत कमी म्हणजे 88.74 टक्के लागला आहे. हिन्दी प्रथम भाषेचा निकाल 89.85 टक्के तसेच हिन्दी द्वितीय भाषेचा निकाल 89.48 आहे.

P*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment