logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*ॲड.किरण बडे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या मोफत आरोग्य शिबिरास प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद..**काशिलिंगेश्वर नगर ग्रामपंचायतीचे संस्थापक तथा निर्माते

*ॲड.किरण बडे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या मोफत आरोग्य शिबिरास प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद..*

*काशिलिंगेश्वर नगर ग्रामपंचायतीचे संस्थापक तथा निर्माते ॲड.किरण बडे यांच्या वाढदिवसानिमित्त* दिनांक 5 में रोजी घेण्यात आलेल्या *मोफत आरोग्य शिबिरास ग्रामपंचायत मधील सर्व सन्माननीय नागरिकांनी प्रचंड व उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.* या शिबिरामुळे *जवळपास 215 नागरिकांना फायदा झाला.* ज्यात *73 रुग्णांना मोफत उच्च रक्तदाब (BP) व मधुमेहाची (Sugar) तपासणी करण्यात आली* तसेच इतर आवश्यक अशी आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. *71 नागरिकांचे आभा कार्ड बनविण्यात आले, 65 नागरिकांचे आयुष्यमान कार्ड व 6 ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना आयुष्यमान कार्ड अगदी मोफत बनविण्यात आले.*
*ज्या नागरिकांचे "आयुष्यमान कार्ड " व ज्या ज्येष्ठ नागरिकांचे "वय वंदना कार्ड" काढून देण्यात आले आहे, त्यांना आता शासनाचे प्रत्येकी 5 लाख रुपये चे आरोग्य विमा संरक्षण देण्यात येणार आहे.* तसेच ज्यांचे "आभा कार्ड" काढण्यात आले आहे त्यांनाही पुढील काळात आरोग्य विषयक फायदा होणार आहे.
*सदरील मोफत आरोग्य शिबीर हे ॲड.किरण बडे यांचे सर्व सहकारी ॲड.प्रभाकर केदार, डॉ.गिरीश केंद्रे, हनुमंत मुंडे, रमाकांत साबदे, विष्णू काका शिंदे, आकाश जमादार, परमेश्वर माने, बस्वराज खानापुरे, परमेश्वर बोराडे, श्रीमंत भताने, ॲड.योगेश बनसोडे, उदय भैय्या गोजमगुंडे, संभाजी पवार, सुरज सुरवसे, रघुनाथ गिरी, श्रीहरी दुवे, विशाल गित्ते यांनी आयोजित केले होते.* या शिबिरास *ग्रामपंचायत मधील खाजा पाशा बागवान, रावसाहेब बडे, लक्ष्मीकांत ताथोडे, वाल्मिक सुरवसे, पोलिस शिवाजी मुंडे, शैलेश गुळभेले, अब्दुल सत्तार शेख, वसीम पठाण, निरंतर साहेब, सौदागर मुज्जमिल, बदरोद्दीन सातभाई, सुरेश केंद्रे, वाल्मिक ढाकणे, अनिकेत मोरे, जमादार काकू, पन्हाळे मॅडम, सुर्यकांत पांचाळ, उबेद पटेल आदी प्रतिष्ठित नागरिकांसह* ईतर अनेक प्रतिष्ठित महिला व पुरुष उपस्थित होते.
सदरील आरोग्य *शिबिराच्या यशस्वीतेसाठी ॲड.किरण बडे यांचे सर्व सहकारी, डॉ.गिरीश केंद्रे व त्यांच्या क्लिनिक मधील सर्व स्टाफ, भातांगळी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असणा-या सर्व आशा स्वयंसेविका, कर्मचारी व आरोग्य मित्र यांनी प्रयत्न व परिश्रम घेतले.*

0
79 views

Comment