logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

किरमिरी येथे स्वयंघोषित अध्यक्ष बनून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न......?

किरमिरी येथे स्वयंघोषित अध्यक्ष बनून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आणि कायदा व सुव्यवस्थेवर बाधा.......गोंडपिपरी तालुक्यातील किरमिरी येथे मागील 30वर्षापासून बौद्ध महासभा नोंदणीकृत अस्तित्वात असून ग्रामपंचायतीत नमुना 8 सुद्धा आहे.या बौद्ध महासभेचे अध्यक्ष बुद्धभगवन डोंगरे आहेत.त्यांनी अध्यक्ष असताना बौद्ध समाजातील काही समाजकंटक समाजात तेढ निर्माण करण्यासाठी संकेत गौतम गव्हारे यांनी भारतीय बौद्ध महासभा ही किरमिरी येथे अस्तित्वात नसतांना मी अध्यक्ष असल्याचा अर्ज ग्रामपंचायत येथे 14 एप्रिल ही बाबासाहेबांच्या जयंती साजरी करण्याकरिता अर्ज सादर केला आणि त्या अर्जाला सचिव चौधरी यांनी कागदपत्र न पाहता त्याला नाहरकत प्रमाणपत्र दिले त्या आधारे पोलिस स्टेशन धाबा आणि त्यानंतर नायब तहसीलदार चांदेकर साहेब गोंडपिपरी यांनी सुद्धा परवानगी देऊन आदेश काढला.संबंधित व्यक्तीवर कार्यवाही करण्यासाठी बौद्ध महासभेचे अध्यक्ष बुद्धभगवन डोंगरे यांनी तहसीलदार साहेब तहसील कार्यालय गोंडपिपरी येथे तक्रार केली .मागील 4 वर्षापासून किरमिरी येथे कित्येक बौद्ध समाजातील लोकांनी स्वतः अध्यक्ष असल्याचे अर्ज करून समाजात दोन गट पाडण्याचे प्रयत्न करीत आहेत आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.खोटे अर्ज सादर करून बुद्ध पौर्णिमा,6डिसेंबर,धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि 14 एप्रिल है कार्यक्रम जबरदस्तीने साजरे करीत आहेत आणि प्रशासन मात्र डोळेझाक करून हातावर हात ठेऊन गप्प आहेत.संबंधित समाज कंठकांवर योग्य चौकशी करून कार्यवाही करावी आणि योग्य न्याय द्यावा अशी अपेक्षा किरमिरी येथील बौद्ध महासभेचे अध्यक्ष मा.बुद्धभगवान डोंगरे यांनी करीत आहेत .न्याय न मिळाल्यास पत्रकार परिषद घेण्यात येईल तसेच वरची पायरी चढण्यात येईल असे मत व्यक्त केलेले आहे.

50
2631 views

Comment