logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला २४ तासात अटक भंडारा शहर डीबी पथकाची कारवाई

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला २४ तासात अटक
भंडारा शहर डीबी पथकाची कारवाई

विलास केजरकर भंडारा.

भंडारा :- शहरातील संत कोलबा स्वामी वार्ड येथे राहणारे मुरलीधर खोत हे त्यांचे परिवारासह दिनांक २९ एप्रिल २०२६ ला काही कार्यक्रमाकरिता बाहेरगावी गेले होते. दिनांक ६ मे २०२६ रोजी सायंकाळी ते परत आले असता त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसून आले. घराच्या आत सामान अस्ताव्यस्त दिसून आले. पाहणी केल्यावर घरातील ४५,००० रुपये नगदी व एक एंड्राइड मोबाईल किंमत ७,००० रू असा ऐवज चोरी झाल्याचे समजून आल्याने पोलीस स्टेशन भंडारा येथे अप क्र १०४०/२६ कलम ३०५ (ए),३३१ Bns अन्वये गुन्हा नोंद करून तपास डीबी पथकाकडे देण्यात आला. पथकाने तपासाची चक्रे फिरवून गोपनीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा युनूस पठाण राहणार बाबा मस्तान शहा वार्ड भंडारा याने केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी शोध करून तत्काळ ताब्यात घेतल्यावर कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. सद्यस्थितीत आरोपी अटकेत असून गरीब कुटुंबास वेळीच न्याय मिळाला असल्याची भावना जनसामान्यात आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक नुरूल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विलास काळे, पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांचे मार्गदर्शनात भंडारा शहर डीबी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष बोरकर, सहा फौजदार तुळशीदास मोहरकर, हवालदार गीता शेंडे, कॉन्स्टेबल अनुप वालदे, रोहित अंबादे, शेषराव राठोड यांच्या पथकाने केली.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur- 440015

5
155 views

Comment