logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ कठोर उपाययोजना राबवून पुणे नसरापूर प्रकरणातील आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी करिता निवेदन....*

*आरोपीला फाशी झालीच पाहिजे*
पति,
मा.मुख्यमंत्री साहेब,महाराष्ट्र राज्य,
विषय.:-
*महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ कठोर उपाययोजना राबवून पुणे नसरापूर प्रकरणातील आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी करिता निवेदन....*

*महोदय*,
महाराष्ट्रात अत्यंत दुःख,संताप आणि गंभीर चिंता व्यक्त करीत आहे.आज महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांची सुरक्षितता हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषय बनलेला असून राज्यात वारंवार महिला व बालिकांवरील अत्याचार,बलात्कार,हत्या, छेडछाड व अमानुष कृत्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत.अशा घटनांमुळे महिलांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सामान्य नागरिकांमध्ये शासन व प्रशासनाविषयी नाराजी आणि असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे.महाराष्ट्र हे छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते,परंतु महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महाराष्ट्र राज्याची प्रतिमा मलिन होत असून शासनाची जबाबदारी अधिक वाढली आहे.
विशेषतः पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेले अमानुष अत्याचार व हत्या प्रकरण हे केवळ एक गुन्हा नसून,संपूर्ण समाजाला हादरवणारा आणि मानवतेला काळीमा फासणारा प्रकार गंभीर घटना आहे.अशा नराधमांनी केलेला अपराध अत्यंत घृणास्पद,क्रूर आणि अमानवीय असून या घटनेने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.महिलांवर होणारे अत्याचार हे केवळ एका पीडितेपुरते मर्यादित राहत नाहीत,तर संपूर्ण समाजाच्या मनामध्ये भीती निर्माण करून अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करतात.आज प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न निर्माण होत आहे की,आपल्या घरातील मुली,माता,भगिनी सुरक्षित आहेत का?
ही परिस्थिती कोणत्याही सुसंस्कृत आणि सक्षम राज्यासाठी अत्यंत लाजिरवाणी आहे.गृह विभाग व पोलीस प्रशासनावर राज्यातील कायदा-सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी आहे,परंतु अनेक वेळा अशा गंभीर प्रकरणांमध्ये पोलीस प्रशासन अपेक्षेप्रमाणे तत्काळ व कठोर भूमिका घेताना दिसत नाही.तपासामध्ये विलंब,आरोपीना मिळणारे अप्रत्यक्ष पाठबळ,पुरावे गोळा करण्यामध्ये दिलाई तसेच न्यायालयीन प्रक्रियेत होणारा वेळकाढूपणा यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढत आहे.गुन्हेगारांना जर वेळीच कठोर शिक्षा झाली नाही,तर अशा नराधमांना समाजात भीती वाटण्याऐवजी अधिक बळ मिळते आणि अशा घटना पुन्हा पुन्हा घडण्याची शक्यता वाढते.त्यामुळे या प्रकरणात कठोरात कठोर कारवाई करून समाजाला स्पष्ट संदेश.देणे अत्यंत आवश्यक आहे की महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना महाराष्ट्रात कोणतीही माफी नाही.आज समाज बांधवांमध्ये एकच प्रमुख मागणी जोरदारपणे घुमत आहे.की सदर प्रकरणातील आरोपीस तात्काळ कठोरात कठोर शिक्षा देऊन फासावर चढवले पाहिजे.कारण अशा अमानुष गुन्ह्यांना जर वेळेत आणि कठोर शिक्षा झाली नाही तर न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास ढासळेल.म्हणूनच सदर प्रकरणाची चौकशी गृह खात्याने तात्काळ स्वतः लक्ष घालून करावी,प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून जलद निकाल लावावा,दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल करावे,तसेच शासनाने अनुभवी विशेष सरकारी वकील नियुक्त करून या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा मिळेल.यासाठी कठोर प्रयत्न करावेत. यासोबतच पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत व पोलीस संरक्षण देऊन त्यांना न्याय मिळेपर्यंत कोणत्याही प्रकारचा दबाव,धमकी किंवा अन्याय होणार नाही याची खात्री करावी.
महोदय,राज्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी केवळ एका प्रकरणात कारवाई पुरेशी नाही,तर शासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस आणि कठोर पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे.महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे,पोलिस यंत्रणेची जबाबदारी निश्चित करणे,दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, तसेच गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा होईल अशी यंत्रणा सक्षम करणे.हे शासनाचे कर्तव्य आहे.महिलांच्या सुरक्षेबाबत जर कठोर उपाययोजना तात्काळ राबवल्या नाहीत,तर भविष्यात समाजामध्ये असंतोष अधिक वाढण्याची शक्यता आहे.तरी आपणांस नम्र विनंती आहे की, नसरापूर येथील अमानुष अत्याचार व हत्या प्रकरणातील आरोपीस कठोरात कठोर शिक्षा देऊन फाशीची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी,सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून जलद निकाल देण्यात यावा,तसेच संपूर्ण महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस आणि कठोर उपाययोजना राबवून अशा नराधमांना कायमचा धडा शिकवावा. आपण स्वतः या प्रकरणात लक्ष घालून त्वरित निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळेल असा विश्वास निर्माण करावा,हीच अकोला जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना लीडर ग्रुप व सम्राट अशोक सेनेची वतीने ठाम मागणी आहे...

सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य
आकाश दादा शिरसाट

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

3
116 views

Comment