शिरूर तालुक्यातील अतिक्रमण नियमित करण्याचे आदेश
पुणे : शिरूर तालुक्यातील गट नंबर 1751/1211 मधील अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 40, 52 व 64 नुसार घेण्यात आला आहे.पुणे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी उपविभाग शिरूर,आणि तहसीलदार शिरूर यांच्या नियंत्रणाखाली ग्रामीण व शहरी भागातील शासकीय जमिनीवरील निवासासाठी करण्यात आलेली अतिक्रमणे नियमित करण्यासाठी मोहीम राबविली जात आहे.
जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी 31 डिसेंबर 2026 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा, या मुदतीतील अर्ज केलेल्या पात्र अतिक्रमण धारकाला संरक्षण मिळणार असून त्यानंतर उशिरा अर्ज करणारे वर कारवाई होण्याची शक्यता आहे सर्व पात्र नागरिकांनी वेळेत अर्ज करावा असे आव्हान भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री अनिल मल्लाव यांनी केले आहे. पात्र नागरिकांना संरक्षण मिळणार असून नद्या, नाले, सार्वजनिक रस्ते, वन जमीन, भूसंखलन प्रवण क्षेत्र, वेटलँड आणि सीआरझेड क्षेत्रातील अतिक्रमण धारकांना नियमित करण्याचा लाभ दिला जाणार नाही; त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून लाभ दिला जाईल. संपर्क.9028289770