शिकाऊ भरती मेळाव्याचे ११ मे रोजी आयोजन
अहिल्यानगर, दि. ७ - राष्ट्रीय शिकाऊ मेळाव्याअंतर्गत कै. माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुरूडगाव रोड, अहिल्यानगर येथे ११ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ या वेळेत शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिकाऊ उमेदवारी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य के. ए. जहागीरदार यांनी केले आहे.
मेळाव्याच्या ठिकाणी उमेदवारांनी उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंक अथवा क्यू आर कोडद्वारे नोंदणी करावी. तसेच दहावी व आयटीआय उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रके, शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड आदी मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतींसह मेळाव्यास उपस्थित राहावे, असेही कळविण्यात आले आहे.
#शिकाऊभरती #ApprenticeshipMela #अहिल्यानगर #AhalyaNagar #आयटीआय #ITIJobs #रोजगारमेळावा #JobFair #बुरूडगाव #ITI #कौशल्यविकास #SkillDevelopment #उमेदवारीभरती #ApprenticeRecruitment #महाराष्ट्रशासन #MahaGov #शिक्षणआणिरोजगार #CareerOpportunity #युवाशक्ती #YouthEmployment