*इंदोरीकरांच्या मुलीच्या लग्नात सोने चोरणारे श्रीरामपूरचे 02 आरोपी धरले*...0
*इंदोरीकरांच्या मुलीच्या लग्नात सोने चोरणारे श्रीरामपूरचे 02 आरोपी धरले*...
श्रीरामपूर/संगमनेर (*शिवप्रहार न्यूज नेटवर्क*) याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.362/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल असुन इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या लग्न ठिकाणी आयोजित ध्वजारोहण कार्याक्रमाच्या वेळी या गुन्ह्यातील फिर्यादी यांचे 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी बळजबरीने चोरुन नेले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेस माहिती मिळाली की,हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी सागर सुरेश कांबळे,रा.रमानगर वार्ड नं.01 श्रीरामपुर याने त्याच्या साथीदारासह केला असुन तो त्याचे साथीदारासह चोरी केलेल्या सोन्याची वाटणी करण्यासाठी मोटारसायकलवर ममदापुर फाटा येथे येणार आहे.म्हणून पथकाने तात्काळ सापळा रचुन दोन इसमांना ताब्यात घेतले. त्यांचे नांव 1) सागर सुरेश कांबळे,वय-32 वर्षे रा. रमानगर वार्ड नं.01 श्रीरामपुर, 2) बबलु उर्फ अब्दुल इब्राहिम पिंजारी वय- 36 वर्षे रा. वार्ड नं.02 श्रीरामपुर असे असल्याचे त्यांनी सांगितले.ताब्यातील आरोपीकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा इतर साथीदार 3) आतिक आयुब उर्फ आरीफ शेख रा. वार्ड नं.02 श्रीरामपुर(फरार), 4) सनी विलास ढोकणे रा.वार्ड नं.02 श्रीरामपुर(फरार) अशांनी मिळुन केल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान आरोपींच्या कब्जातुन 1,49,500/-रु कि.ची 11.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे, 70,000/-रु कि.चे दोन मोबाईल, 70,000/- रु.ची मोटारसायकल असा एकुण 2,89,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ताब्यातील आरोपी व मुद्देमाल पुढील तपासकामी संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलेले असुन पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाणे करीत आहे.
जिल्ह्यामध्ये चैनस्नॅचिंग करणारे आरोपीबाबत माहिती असल्यास स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथील फोन नंबर 0241-2416111, डायल 112 यावर कळविणेबाबत आवाहन पोलीसांनी केले आहे.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015