सततचा त्रास असह्य झाल्याने पत्नीकडून मद्यपी पतीचा गळा आवळून खून
जळगाव : दारू पिऊन वारंवार त्रास
देणाऱ्या भरत नामदेव पाटील (५८, रा. केसी पार्क) याचा पत्नीने गळा आवळून खून केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद असलेल्या या घटनेत मयताच्या गळ्यावरील व्रण व शवविच्छेदन अहवालानंतर शहर पोलिस ठाण्यात मयताची पत्नी मनीषा भरत पाटील (५०) हिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कानळदा रस्त्यावरील केसी पार्क परिसरातील भरत पाटील हे पत्नी व दोन मुलांसह राहत होते. त्यांची पत्नी एका कापड दुकानात तर दोघं मुलं एमआयडीसीत कंपनीत कामाला होते. भरत पाटील हे दररोज दारुच्या नशेत पत्नीसह मुलांना त्रास देत होते. मंगळवारी (५ मे) रात्री ९ वाजता मनिषा पाटील या कामावरुन घरी परतल्या त्यावेळी पती दारुच्या नशेत घराच्या ओट्यावर बसलेला होता. त्या वेळी त्याने पुन्हा दारुच्या नशेत पत्नीसोबत वाददोरीने आवळला गळा
पती व पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात मनिषा पाटील यांनी प पाटील याचा दोरीच्या सहाय्याने गळा अ व पलंगावरून त्यास खाली ओढले. त्या जमीनीवर डोके आपटले गेले कानातून, नाकातून मोठा रक्तस्त्राव झाला. लगेचच परिसंरातील एका तरुणाने भरत पाटील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
मद्यपी पतीचा त्रास झाला असह्य
भरत पाटील यांचा पलंगावरुन पडून नव्हे तर गळा आवळून मृत्यू झाल्याचे निष्पन्न होताच, पोलिसांनी संशयित मनीषा पाटील यांची कसून चौकशी केली असता, दारुच्या आहारी गेलेल्या पतीकडून वारंवार त्रास दिला जात होता. त्याला कंटाळून संतापाच्या भरात गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. त्यामुळे अकस्मात मृत्यूची नोंद असलेल्या प्रकरणात नंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.