मुरबाड: झेन्झी फार्मास्युटिकलमध्ये 'मनसे'चा भगवा फडकला! कामगार सेनेच्या नवीन युनिटची घोषणा
मुरबाड: कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने आता मुरबाडमधील कुडवली येथील झेन्झी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये अधिकृतपणे एन्ट्री केली आहे. मनसे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार या नवीन युनिटची स्थापना करण्यात आली असून, यामुळे कंपनीतील कामगारांना आता हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे.
प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सोहळा
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष डॉ. मनोज चव्हाण, मनसेचे खंबीर नेते श्री. अविनाश जाधव आणि उपाध्यक्ष श्री. परशुराम साळवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी भिवंडी लोकसभा अध्यक्ष श्री. शैलेश बिडवी, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष उल्हास दादा भोईर, उपचिटणीस भावेश पाटील, सुनील आवारी आणि देवेन्द्र जाधव यांची विशेष उपस्थिती होती.
नूतन कार्यकारिणी सदस्य
झेन्झी फार्मास्युटिकल युनिटच्या कामकाजासाठी खालीलप्रमाणे कमिटी जाहीर करण्यात आली आहे:
अध्यक्ष: रामदास कंटे
उपाध्यक्ष: संतोष ढमके
सचिव: महेश म्हारसे
खजिनदार: सुजीत विशे
संघटना काय करणार?
या युनिटच्या स्थापनेमुळे कंपनीतील कामगारांच्या प्रलंबित समस्या, त्यांच्या हक्कांच्या मागण्या आणि इतर अडचणी सोडवण्यासाठी मनसे आता थेट आणि आक्रमकपणे मैदानात उतरणार आहे. कामगार हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.
या नियुक्तीबद्दल नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, मुरबाड परिसरात मनसेचे संघटन अधिक मजबूत झाल्याचे दिसून येत आहे. आता कामगारांच्या हितासाठी मनसेचा आवाज घुमणार!