logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

बामनोली: दंड वस्ती – मावशी रस्त्याच्या कामाला सुरुवात

बामनोली, ता. जावळी : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बामनोली – दंड वस्ती – मावशी रस्त्याच्या कामाला Public Works Department (PWD) विभागाकडून अखेर सुरुवात झाली असून परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा रस्ता दुर्गम भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून शालेय विद्यार्थी, शेतकरी, महिला तसेच रुग्णवाहिका सेवेसाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. सध्या काम वेगाने सुरू असून ग्रामस्थांनी प्रशासनाकडे दर्जेदार व टिकाऊ काम करण्याची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांनी कामाचे अंदाजपत्रक, मुदत, ठेकेदार व तांत्रिक माहिती सार्वजनिक करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार रस्ता पूर्ण झाल्यास दुर्गम भागातील वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि पर्यटन व स्थानिक विकासाला चालना मिळेल. संबंधित अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाहणी करून काम गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

1
623 views

Comment