logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सोलापूर बोरामणीतील मोठी अतिक्रमण हटाव कारवाई..

सोलापूर: (प्रतिनिधी)

दक्षिण तालुक्यातील बोरामणी परिसरातील दावल मलिक बाबा पीर दर्ग्याजवळ वन विभागाने बुधवारी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव कारवाई केली. ५ जेसीबी, १० टेम्पो, ट्रॅक्टर आणि पोलिस बंदोबस्तासह जवळपास ९० ते १०० अधिकारी-कर्मचारी सहभागी होऊन अनेक वर्षांपासून उभारलेली दुकाने, पत्र्याची शेड, टपऱ्या, पाण्याच्या टाक्या आणि पक्की बांधकामे हटवण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

वन विभागाने यापूर्वी संबंधितांना वारंवार नोटिसा बजावल्या होत्या, मात्र अतिक्रमणे हटवली जात नसल्यामुळे अखेर प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली. २० ते २५ दुकाने आणि ३० ते ४० अतिक्रमणे हटवण्यात आल्या. दावल मलिक दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव मन्सावाले आणि सचिव लिजाम मुजावर यांनी २ जानेवारी रोजी सहायक वनसंरक्षक यांच्यासमोर आपली बाजू मांडली होती, परंतु आवश्यक कागदपत्रे सादर न झाल्यामुळे अतिक्रमणे निष्कासित करण्याचे आदेश देण्यात आले. प्रशासनाने वनजमिनीवरील अतिक्रमणे सहन न करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.

1
515 views

Comment