फ्लिपकार्ट कंपनीच्या डिलिव्हर एजंटची मनमानी कारभार....नागरिकांमध्ये असंतोष..
आजच्या तंत्रयुगात दुकानात जाऊन वस्तूची खरेदी करण्यापेक्षा, जास्तीत जास्त सामान्य जनता ऑनलाईन पद्धतीने वस्तू खरेदी करण्यास सुलभ समजतात. दुकानापेक्षा ऑनलाईन वस्तू स्वस्त मिळतात या भावनेतून जास्तीत जास्त नागरिक ऑनलाईन खरेदी कडे झुकलेला आहे.अश्यातच काही डिलिव्हरी एजंट गोंडपिपरी तालुक्यात मनमानी कारभार करताना आढळले. एखाद्या वस्तूची खरेदी केल्यानंतर ती वस्तू फ्लिपकार्ट कंपनी 7 दिवसाच्या आत परत घेतात असे त्यांचे नियम ठरलेले असतात. परत केलेल्या वस्तूची धन राशीं खात्यात जमा होते हे कंपनीचे नियम असतात.पण घटना अशी घडली कि एका ग्राहकाने 30 तारखेला फ्लिपकार्ट कंपनीची वस्तू ऍपवरून रिटर्न केली पण पीकअप करण्याची अंतिम तारीख 5 तारीख होती पण तारीख जाऊनसुद्धा कुणी एजंट पीकअप करण्यासाठी आलेला नाही. वस्तू होती 950/- रु किमतीची. यावरून फ्लिपकार्ट कंपनीच्या एजंट च्या मनमानी पणा स्पष्ट दिसून येत आहे. आणि ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पुढे जाऊन फ्लिपकार्ट कंपनी ती वस्तू परत घेणार कि नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे..