logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

ब्रम्ही चे बेग सर कराड (सातारा) मध्ये 'उर्दू वाचन' अभियानात राज्यस्तरावर चमकले!

अकोला /मूर्तिजापूर :- मी 'पठाण पत्रकार' न्यूज' प्रतिनिधी. आजची सर्वात मोठी शैक्षणिक बातमी! सातारा जिल्ह्यातील कराड येथील उर्दू माध्यमाच्या शाळेत कार्यरत असलेले बेग सर यांनी आपल्या उर्दू वाचन अभियानातून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण 'यशोगाथे'ची निवड राज्यस्तरावर करण्यात आली आहे. उर्दू भाषा आणि वाचनाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे.

कराड (सातारा) येथील उर्दू शिक्षकांनी उर्दू भाषा संवर्धन आणि वाचन संस्कृती रुजवण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे. 'उर्दू वाचन अभियान' अंतर्गत बेग सर (Beg Sir) यांच्या अभिनव शैक्षणिक यशोगाथेची (Success Story) महाराष्ट्र राज्यस्तरावर विशेष निवड करण्यात आली आहे.
बेग सर यांनी विद्यार्थ्यांना उर्दू भाषेची गोडी लावण्यासाठी मनोरंजक पद्धतींचा वापर केला.उर्दू वाचन अभियानातील त्यांच्या यशोगाथेची निवड राज्यस्तरावर करून त्यांना गौरवण्यात आले आहे.उर्दू माध्यमाचे सक्षमीकरण: या उपक्रमाचा मुख्य उद्देश उर्दू शाळांचा पाया भक्कम करणे आणि वाचन संस्कृती वाढवणे.

46
1989 views

Comment