logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

"व्हॉईस ऑफ मीडिया" तर्फे जिल्हाधिकारी सावन कुमार यांचा सत्कार विश्रामगृहात पत्रकारांसाठी बैठक कक्षाची मागणी

"व्हॉईस ऑफ मीडिया" तर्फे जिल्हाधिकारी सावन कुमार यांचा सत्कार
विश्रामगृहात पत्रकारांसाठी बैठक कक्षाची मागणी

विलास केजरकर भंडारा.

भंडारा : भारत देशात ४ लाख पत्रकार असलेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील "व्हॉईस ऑफ मीडिया" जिल्हा भंडारा वतीने बुधवार ६ मे २०२६ ला जिल्हाधिकारी सावन कुमार यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भंडारा, साकोली, लाखनी, पवनी, तुमसर, मोहाडी येथील सर्व तालुका अध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या भंडारा जिल्हा व्हॉईस ऑफ मीडियाच्या झालेल्या जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारींचा पदग्रहण सोहळा व पत्रकार कार्यशाळेला जिल्हाधिकारी अनुपस्थित असल्याने जिल्हा पदाधिकाऱ्यांनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांच्या समस्यांवर विविध विषयांवर चर्चा करीत भंडाराचे जिल्हाधिकारी सावन कुमार यांचा व्हॉईस ऑफ मीडिया भंडारा जिल्हा अध्यक्ष शशिकांत भोयर यांचे मार्गदर्शनात सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी भंडारा शहरातील मुख्य विश्रामगृह परीसरात असलेल्या बावनथडी किंवा वाघ या दोन सुट पैकी एक सुट पत्रकारांसाठी नियमित बैठक व्यवस्थेसाठी मागणी करण्यात आली. याप्रसंगी व्हॉईस ऑफ मीडिया चे भंडारा शहर अध्यक्ष काशिनाथ ढोमने, विशाल रणदिवे उपाध्यक्ष, आशिष चेडगे तालुका अध्यक्ष साकोली, कालिदास खोब्रागडे महासचिव, डी. जी. रंगारी सचिव, तुषार पशीने, किशोर गडकरी, राकेश शामकुंवर, संजय नागदेवे, विलास केजरकर, समीर नवाज, मुकेश मेश्राम इत्यादी पत्रकार उपस्थित होते.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

20
707 views

Comment