साठा गुन्हे शाखा विभाग यांची मोठी कामगिरी लातूर
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : अवैध देशी दारू वाहतूक करणारा आरोपी रंगेहात पकडला १४.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त.
लातूर जिल्हा पोलीस दलाच्या अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीस रंगेहात पकडले आहे. सदर कारवाईत एकूण १४,२८,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामध्ये मोठ्या प्रमाणावर देशी दारूचा साठा व वाहनाचा समावेश आहे.
दि. ०४ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार अवैध धंद्यांवर कारवाई करत असताना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहिती वरून , दुपारी १२:४० वाजण्याच्या सुमारास इंदरठाणा ते नागझरी मार्गावर पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा (MH-04-EM-7373) गाडीतून देशी दारूची अवैध वाहतूक करीत असताना पोलिसांनी सदरचे कार थांबवून झडती घेतली असता, गाडीत मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा आढळून आला.
सदर आरोपीचे नाव विकास प्रकाश गायकवाड (वय ३० वर्षे, रा. गणपती मंदिर परिसर, टाकळी ब., ता. जि. लातूर) असे असून
झडतीदरम्यान सिमला संत्रा, असली धार संत्रा, टॅंगो पंच, जी.एम. डॉक्टर या विविध ब्रँडच्या देशी दारूच्या ९० एम.एल.च्या हजारो बाटल्या
एकूण दारूची किंमत : २,२८,०००/- रुपये वाहतुकीस वापरण्यात आलेली टोयोटा इनोव्हा कार १२,००,०००/- रुपये असा एकूण : १४,२८,०००/- रुपयेचा मुद्देमाल मिळून आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ), ६५(ई), ८१, ८३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, लातूर श्री. अमोल तांबे यांच्या आदेशाने,अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार अर्जुन रजपूत, साहेबराव हाके, मनोज खोसे, प्रवीण कोळसुरे, आनंद हल्लाळे यांनी केली आहे.