पुरंदर विमानतळासाठी एकरी दोन कोटी रूपये एक नोकरी दहा टक्के विकसित भुखंड.
दि ७ हवेली (प्रतिनिधी-अंबादास गोरे)
प्रस्तावित पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण प्रक्रियेला वेग आला आहे शेतकऱ्यांना आकर्षक मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रत्येक एकर जमिनीसाठी सरासरी २ कोटी रुपये इतका मोबदला देण्यात येणार आहे. याशिवाय, जमीन देणाऱ्या प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला MIDC किंवा विमानतळ प्रकल्पाशी संबंधित नोकरी देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच, तसेच शेतकऱ्याकडून घेण्यात आलेल्या जमिनीपैकी १० टक्के जमीन विकसित भूखंड शेतकऱ्याला परत केला जाणार असल्याची मोठी घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आकर्षक पॅकेजमुळे शेतकऱ्यांकडून जमीन अधिग्रहण प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार असल्याचे मानले जात आहे.
#PurandarAirport #purandar #punenews