logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

धुळे–पिंपळनेरमध्ये उष्णतेचा कडाका तापमान 42°C पार

धुळे : धुळे व पिंपळनेर परिसरात सध्या उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमानाने ४२ अंश सेल्सिअसच्या पलीकडे गाठले आहे. धुळे जिल्ह्यात आज कमाल तापमान सुमारे ४१ ते ४२ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे तर किमान तापमान २८ अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे.

पिंपळनेरमध्येही उष्णतेची लाट कायम असून तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर नागरिकांची संख्या कमी झाल्याचे दिसते. तज्ज्ञांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला असून उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी, लिंबूपाणी आणि ताक यांसारख्या द्रव पदार्थांचे सेवन करण्याचा आग्रह केला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत प्री-मान्सूनमुळे काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे, पण उष्णतेपासून तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

17
1531 views

Comment