logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

कॅनमधून पेट्रोल-डीझेल विक्री करणाऱ्या दोन पेट्रोल पंपांचा पुरवठा निलंबित; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर एचपीसीएलची मोठी कारवाई

कॅनमधून पेट्रोल-डीझेल विक्री करणाऱ्या दोन पेट्रोल पंपांचा पुरवठा निलंबित; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर एचपीसीएलची मोठी कारवाई

लातूर जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपांवर नियमांचे उल्लंघन करून कॅन आणि बॅरलमध्ये पेट्रोल-डिझेलची विक्री होत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. तसेच याबाबत जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांना भ्रमणध्वनीद्वारे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठविलेल्या पत्राची दखल घेत हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने जिल्ह्यातील दोन पेट्रोल पंपांचा इंधन पुरवठा तात्काळ प्रभावाने निलंबित केला असून या पंपांची लवकरच सखोल चौकशी केली जाणार आहे.

लातूर जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपांवर ग्राहकांना जार, कॅन किंवा बॅरलमध्ये डिझेल आणि पेट्रोल दिले जात असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांना प्राप्त झाल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार, अशा प्रकारे सुट्या स्वरूपात इंधन विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने एचपीसीएल कंपनीला दिली.

लातूर जिल्ह्यात पेट्रोल-डीझेल विक्रीबाबत नियमावली लागू करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव कॅन किंवा बॅरलमध्ये पेट्रोल-डीझेल नेणे धोकादायक असल्याने जिल्हा प्रशासनाने यावर बंदी घातली आहे. जर इतर कोणत्याही पेट्रोल पंपावर असे नियमबाह्य प्रकार आढळून आले, तर त्यांच्यावरही अशाच स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आला आहे.

1
0 views

Comment