logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात उपशामक काळजी विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न

हिंगणघाट, दि. ५ मे २०२६ : उपजिल्हा रुग्णालय, हिंगणघाट येथे आज उपशामक काळजी (Palliative Care) या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रशिक्षणाचे आयोजन वैद्यकीय अधीक्षक मा. डॉ. आशिष लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या कार्यक्रमात सामुदायिक आरोग्य अधिकारी, अधिपरीचारिका, आरोग्य सेवक तसेच इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. प्रशिक्षणादरम्यान उपशामक काळजी विषयाची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच पॅलिएटिव्ह रुग्णांची घरच्या घरी (Home Care) काळजी कशी घ्यावी आणि फिजिओथेरपी कशा प्रकारे करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून डॉ. रुईकर, डॉ. मूजाईद, डॉ. बेलेकर, डॉ. डेहने, श्री. लिडबे, अधिपरीचारिका मानकर सिस्टर तसेच पुनर्वसन कर्मचारी प्रणिता तेलंग यांनी मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचे ज्ञान व कौशल्य वृद्धिंगत होऊन पॅलिएटिव्ह रुग्णांना अधिक प्रभावी सेवा देण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

18
2211 views

Comment