नगर : खा. निलेश लंके समर्थकांनी तरुणावर अत्याचार केला
नगर : खा. निलेश लंके यांच्याबाबत सोशल मिडियावर पोस्ट टाकल्याच्या रागातून २८ वर्षाच्या किशोर महादेव परभणे याला कपडे काढून उघडे करून, लघवी पाजून संडास साफ करायला लावल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. किशोर परभणे यांनी नगर तालुका पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर प्रविण विजय मोरे, शरद खंडू पवार, मारूती देवराम कोकाटे, रॉबीन सिंग व एक अनोळखी व्यक्ती यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपींनी खराडी येथून पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीत त्याला अपहरण करून चिंचोडी पाटील भागातील हरिओम हॉटेलच्या मागील रूममध्ये बंदी ठेवले. त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, धमकी दिली व मोबाईल घेत संडास साफ करायला लावले. त्याचबरोबर त्याच्यावर लघवी पाजून दबाव आणून अपमानजनक व्हिडीओ देखील काढला. पोलीस पोसई पतंगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपी खा. निलेश लंके यांचे समर्थक असल्याचे समजते.