संभागीनगर: धनाजी जोशी यांना हिरोज पुरस्काराने सन्मान
संभागीनगर : सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते देगलुरकर धनाजी जोशी यांना 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या प्रतिष्ठित 'अनसंग एव्हरीडे हिरोज पुरस्कार'ाने सन्मानित करण्यात आले. समाजसेवा आणि जनकल्याण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमात महापौर समीर पाटील राजुरकर, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी गौडा जी.सी., मनपा नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल, महाराष्ट्र अपेक्स मेंबर पांडुरंग शेळके, जयश्री पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मंत्री संजय शिरसाठ यांनी धनाजी जोशी यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या योगदानाला महत्व दिले. धनाजी जोशी यांनी पुरस्कार स्वीकारताना हा सन्मान त्यांच्या सहकाऱ्यांचा असल्याचे सांगितले आणि भविष्यातही समाजसेवेचे कार्य जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनीही उत्साहाने सहभाग घेतला आणि 'आर्ट ऑफ लिव्हिंग' संस्थेच्या सामाजिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच कॉंग्रेसचे नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे, भाजपचे पदाधिकारी दिपक संगमकर यांच्यासह अनेक नेत्यांनी धनाजी जोशी यांचा सत्कार केला.