कल्याण-अहिल्यानगर माळशेज मार्गावर एस-टी बस आणि स्कॉर्पिओ कारचा भीषण अपघात तीन जण जागीच ठार एक जण गंभीर जखमी....
महाराष्ट्र,टोकावडे तारीख-५ मे २०२६ मुरबाड तालुक्यातील टोकावडे येथे सकाळी १०:३० च्या दरम्यान एक भीषण अपघात झाला असून त्यात तीन जणांनी आपला प्राण गमावला आहे तर एक जण गंभीर रित्या जखमी झाला आहे,
सकाळी ७ वाजता कल्याण वरून माळशेज मार्गे अहिल्यानगर कडे जाणाऱ्या एस-टी बस क्र-एम एच-२०बीएल३०४८ या बसची कल्याण दिशेने येणाऱ्या स्कॉर्पिओ कारला वैशाखरे वळणावर जोरदार धडक दिली.हा अपघात एवढा भीषण होता की,स्कॉर्पिओ गाडीतील तीन जणांचा यामध्ये जागीच मृत्यू झालेला असून त्यामध्ये दोन स्त्री व एक पुरुषाचा समावेश आहे,जखमीना टोकावडे येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.प्रत्यक्ष दर्शीच्या मते ह्या अपघाताला गाडीचा वेग व वाहनवरील ताबा सुटल्याचे म्हंटले जात आहे.
दरम्यान नेमका हा अपघात कसा झाला याचा तपास टोकावडे पोलीस करत आहे