पाणी जपूनच वापरा...!!!
देशपांडे गल्लीत नागरिकांना सांडपाण्याचा त्रास
देशपांडे गल्लीचा रस्ता हा काँक्रीटचा झालेला आहे ही चांगली गोष्ट आहे.. पण त्यासोबत एक वाईट गोष्ट झाली आहे.. त्या रस्त्याचा उतार हा सनी झेंड यांच्या घरापर्यंत आलेला आहे.. आणि एक्सप्रेस नळ असल्यामुळे वरचे सर्व नागरिक आपापले दार रोज स्वच्छ करतात.. परिणामी (ड्रेनेज असूनही) सर्व घाण पाणी रस्त्यावरून सनी झेंड यांच्या घरापर्यंत येत असते.. तिथे बाकीच्या अनेक लोकांचे घर असल्यामुळे सर्वांनाच त्रास होतो... नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आलेले आहे पण या विषयावर कोणीच बोलत नाही.. पण मी सर्वांशी बोललो असता माझ्या घरापाशी असलेले सर्व लोक मला म्हटलेत की यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे
म्हणून..
सर्व देशपांडे गल्लीतील नागरिकांच्या वतीने मी वर्तमान नगरसेवकांना विनंती करतो की लवकरात लवकर देशपांडे गल्ली येथील येणारे सांडपानी थांबवा.. अन्यथा आम्ही देशपांडे गल्लीतील नागरिक पण पुढे निवडणूक आल्यावर तुम्हाला मतदान करताना विचार करू...
आपला मतदार -