नानासाहेब बच्छाव यांना बेस्ट व्हिलन साठी पद्मश्री पुरस्कार
साक्री तालुक्यातील मालपूर (कासारे) येथील जन्मलेले कराटे मास्टर नानासाहेब बच्छाव यांना 2 मे रोजी शिर्डी येथे राष्ट्रीय पातळीवर दिव्य महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सावित्री कलयुगातली या मराठी चित्रपटातील त्यांच्या बेस्ट व्हिलन भूमिकेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाला चार इंटरनॅशनल आणि सहा नॅशनल पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
नानासाहेब बच्छाव यांनी 36 वर्षे बँकिंग क्षेत्रात काम केले असून त्यानंतर 35 वर्षे कराटे शिकवले. त्यांनी सावित्री कलयुगातली चित्रपटात निगेटिव्ह रोल केला आहे, ज्यामध्ये भारतीय रूढी, परंपरा आणि व्रत वैकल्य यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या पुरस्काराचे आयोजन ओम साई प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म्सच्या वतीने सुदाम संसारे यांनी केले होते, ज्यात देशभरातून 275 कलाकार, शिक्षक, वकील आणि समाजसेवक सहभागी झाले होते.