logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

वेलगूर जि.प. शाळेत अपंगाला ट्रायसिकल व वाकरचे वितरण

वेलगूर येथे अपंगाला ट्रायसिकल व वाकरचे वितरण
वेलगूर :::
अपंग (दिव्यांग) व्यक्ती व विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाकडून त्यांना आवश्यक साहित्याचे वितरण योजनेअंतर्गत केले जाते. याच योजनेचा लाभ अस्थिव्यंग असणाऱ्या वेलगुर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थी संदीप आलम याला एक मे महाराष्ट्र दिनी पालकांसमक्ष ट्रायसीकल व वाकरचे वितरण करून त्याला लाभ देण्यात आला.
अपंग वित्त व विकास महामंडळ आणि समाज कल्याण विभागात मार्फत ८० टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना याची मदत मिळते. याचा लाभार्थी वेलगुर शाळेतील विद्यार्थी असल्याने त्याला मान्यवरांच्या हस्ते ट्रायसिकल व वाकरचे वितरण यावेळी करण्यात आले.
वितरणावेळी मुख्याध्यापक टी.बी नैनलवार, प्रभाकर आचेवार, विनोद खांडेकर, लक्ष्मण रत्नम,मीनाक्षी कुमरे, वंदना येलावार व रापरतीवार तसेच पालक वर्ग यावेळी उपस्थित होते.

10
3016 views

Comment