logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

बारामती लोकसभा पोटनिवडणुकीत सुनीत्रा पवार यांचा विक्रमी विजय

बारामती : बारामती लोकसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनीत्रा पवार यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवून एक नवा इतिहास रचला आहे. या विजयानंतर त्यांनी बारामतीच्या जनतेचे मनापासून आभार मानले आहेत.

विजयी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुनीत्रा पवार भावूक झाल्या होत्या. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करत म्हटलं की, अजित पवार जिवंत नसल्याची उणीव कायम जाणवते, मात्र बारामतीच्या जनतेने त्यांच्या कार्यावर आणि विचारांवर जो विश्वास दाखवला तोच विजयाचा पाया आहे. सुनीत्रा पवार म्हणाल्या की, बारामतीकरांनी त्यांना भरभरून प्रेम आणि साथ दिल्याबद्दल त्या ऋणी आहेत आणि त्या विश्वासाला पात्र राहून बारामतीच्या विकासाचा वारसा पुढे नेतील.

विजयाच्या घोषणेनंतर बारामतीसह संपूर्ण मतदारसंघात कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. 'अजित दादा अमर रहे' आणि 'सुनीत्रा वहिनींचा विजय असो' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

0
603 views

Comment