logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

कल्याण आगारात एसटी बससेवेतील अनियमितता, प्रवाशांचे हाल

कल्याण: कल्याण आगारातून सुटणाऱ्या राज्य परिवहन (एसटी) बससेवेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता दिसून येत आहे. प्रवाशांचे तक्रारींप्रमाणे नियोजित वेळापत्रकाचे पालन होत नाही, अनेक गाड्या उशिरा सुटतात किंवा अचानक रद्द होतात. बस वेळेवर न निघाल्यामुळे कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

काही प्रवाशांनी तासन्तास डेपोमध्ये थांबूनही बस मिळत नसल्याचे सांगितले असून पर्यायी वाहतूक साधनांचा वापर करावा लागतो आणि त्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागतो. प्रवाशांच्या मागण्यांमध्ये बस सेवा वेळेवर सुरू करणे, उशीर झाल्यास तात्काळ माहिती देणे, अतिरिक्त बसची व्यवस्था करणे व डेपो व्यवस्थापन सुधारण्याचा समावेश आहे. प्रवासी संघटनांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की परिस्थिती सुधारली नाही तर आंदोलन होईल.

12
1324 views

Comment