logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

प्रेयसी कोणाची यावरून भरचौकात तरुणाला भोसकले धक्कादायक घटना तरुणाची प्रकृती चिंताजनक

शहापूर साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी

उल्हासनगर शहरातील गुन्हेगारी घटनांमुळे पुन्हा एकदा शहरात खळबळ माजली आहे. उल्हासनगर शहरातील कॅम्प पाच भागातील नेताजी चौक परिसरात २१ वर्षीय तरूणावर पाच जणांनी मिळून जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तरूणाच्या पोटात सुरा भोसकण्यात आला. तसाच सुरा घेऊन तरूणाला सुरूवातीला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला कळवा रूग्णालयात पाठवण्यात आले. मात्र वर्दळीच्या चौकात झालेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली.
अंबरनाथच्या शिवमंदिर परिसरात राहणारा शुभम वाघे याला त्याच्या पूर्वीच्या प्रेयसीच्या आताच्या प्रियकराने नेताजी चौकात बोलवले होते. शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शुभम त्याचा भाऊ गणेशसह नेताजी चौकात पोहोचला. त्यावेळी ती प्रेयसी तुझी कोण असा प्रश्न रोहित नावाच्या आरोपीने शुभमला विचारला. त्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वाद झाले.
रोहित आणि त्याच्यासोबत असलेल्या तीन ते चार आरोपींनी शुभम आणि त्याचा भाऊ गणेश वाघे याच्यावर हल्ला केला. यावेळी तुफान मारहाण सुरू झाली. यावेळी आरोपी रोहित याने चाकू काढून वार शुभम याच्यावर वार करण्याच्या प्रयत्न केला. मात्र त्याने हात मध्ये टाकल्याने वार चुकला. त्याचवेळी गणेश वाघे हा मध्ये वाद सोडवण्यासाठी गेला असता त्याच्यावरही जोरदार वार करण्यात आले. तर एका हल्लेखोराने थेट त्याच्या पोटात चाकू खुपसला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे चाकू पोटात अडकलेल्या अवस्थेतच गणेश रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळला.या घटनेनंतर परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाली होती. गणेश वाघे हा चाकु पोटात असताना विव्हळत खाली पडला होता. काही स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत गणेशला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी कळवा येथील रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाने दिली. दरम्यान, हिललाइन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत रोहित नावाच्या आरोपीसह इतर चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

15
1071 views

Comment