logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सीएफआय–बीएनवायतर्फे विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल उत्साहात सायन्स पार्कमध्ये ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग; प्रयोगातून विज्ञानाची गोडी

सीएफआय–बीएनवायतर्फे विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल उत्साहात
सायन्स पार्कमध्ये ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग; प्रयोगातून विज्ञानाची गोडी
खराडी : प्रतिनिधी उमेश पाटील 8530664576
सीएफआय (चाइल्ड फाउंडेशन इंडिया) व बीएनवाय यांच्या संयुक्त विद्यमाने खराडी परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सुमारे ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या सहलीत लेट गणपतराव थिटे स्कूल, शिवराज स्कूल, सुंदराबाई मराठे विद्यालय तसेच जेनबा सोपनराव मोझे स्कूल येथील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांना वर्गात शिकवले जाणारे विज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून समजावे व विषयाविषयी रुची वाढावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
सायन्स पार्कमधील विविध वैज्ञानिक प्रयोग, तारांगणाचा अनुभव तसेच नायट्रोजनसारख्या प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या संकल्पना सोप्या व रंजक पद्धतीने समजल्या. प्रयोगातून शिकण्याचा अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
सीएफआय व बीएनवाय यांच्या माध्यमातून खराडी, वडगाव शेरी, हडपसर व फुरसुंगी परिसरातील शाळांमध्ये विविध शैक्षणिक व समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. यामध्ये शैक्षणिक सहली, संगणक कक्ष उभारणी, सायन्स लॅब सुविधा, प्रोजेक्टर तसेच शाळांची रंगरंगोटी आदींचा समावेश आहे.
या सहलीचे आयोजन डॉ. किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी शिक्षकवर्ग, बीएनवाय कंपनीचे कर्मचारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वर्गाबाहेरील शिक्षणाचा मौल्यवान अनुभव मिळाला असून विज्ञान विषयाविषयी उत्सुकता व शिकण्याची प्रेरणा वाढली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरांतून सीएफआय व बीएनवाय यांचे आभार मानण्यात आले.

2
36 views

Comment