*पाटात अंघोळीवरून मंगेशवर ब्लेडने वार...*
*पाटात अंघोळीवरून मंगेशवर ब्लेडने वार...*
श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर शहरातील नॉदर्न बँच येथे दहाव्याच्या ओट्याजवळील पाटावर अंघोळ करण्यावरून वाद होवून एकाच्या छातीवर ब्लेडने वार करून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर शहरातील नवी दिल्ली, वॉर्ड न. २, येथील मंगेश विजू पगारे, हा दुपारी ३.३० च्या सुमारास अंघोळ करण्यासाठी नॉदर्न ब्रँच येथील दहाव्याच्या ओट्याजवळ पाटावर गेला होता. त्या ठिकाणी कपडे काढून अंघोळीला जात असताना तेथे त्याच्या ओळखीचे ताजू पिंजारी व भाऊ सोनू पिंजारी आले. तेव्हा ताजू म्हणाला की, तू येथे अंघोळ करू नको, आम्हाला येथे अंघोळ करायची आहे. त्यावर मंगेश त्याला म्हणाला की, मी तुमच्यापासून बाजूला जाऊन अंघोळ करतो.याचा राग येवून त्यांनी जवळच पडलेले ब्लेड घेवून मंगेशच्या छातीवर मारले. त्यामुळे मंगेश जखमी होवून त्यातू रक्त येऊ लागले. तेव्हा ताजू व सोनू पिंजारी हे त्याला शिवीगाळ करत मारहाण होते.तसेच परत येथे दिसला तर तुझा कार्यक्रम करू असा दम आरोपींनी मंगेशला दिला.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात मंगेश पगारे याने फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी ताजू उर्फ हमीद राजू पिंजारी,बाप्या उर्फ सोनू राजू पिंजारी यांच्याविरूद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.नि. नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.
सर्वात वेगवान,ताज्या व बेधडक बातम्या वाचण्यासाठी आपल्या "शिवप्रहार न्यूज" च्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा :
https://chat.whatsapp.com/KPpxKFm9QF84nq7oC0xzH3?mode=gi_t
[30/04, 7:07 pm] devashishtokekar05: *Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015