ट्रामा हेल्थकेअर सेंटर ची इमारत डॉक्टरांच्या प्रतिक्षेत
भिवापूर येथील ट्रामा हेल्थकेअर सेंटर ची इमारत मागील चार-पाच वर्षापासून डॉक्टरांच्या प्रतिक्षेत धूळखात आहे. ज्या उद्देशाने भिवापूर येथील ट्रामा हेल्थकेअर सेंटर ची इमारत बांधली आहे. तो उद्देश माञ स्थानिक लोक प्रतिनिधी च्या हलगर्जीपणा मुळे व आपसी व्देष भावना मुळेच पुर्णत्वास आलेला नसल्याचे बोलल्या जात आहे. माञ परिसरातील जनता ट्रामा हेल्थकेअर सेंटर च्या उपचाराच्या लाभास मुकली असुन छोट्या मोठ्या उपचारासाठी नागपूर ला धाव घ्यावी लागते. जनतेच्या डोळ्यात धूळ झोकण्याचे काम मात्र पध्दतशिरपणे ग्रामीण रुग्णालयातील ओपीडी विभाग नविन ट्रामा हेल्थकेअर सेंटर च्या इमारती मध्ये शिप्ट करून ट्रामा हेल्थकेअर सेंटर सुरू असल्याचा केविलवाणा प्रयोग केलेला आहे. जेंव्हा कि ग्रामीण रुग्णालयाची इमारत सर्व प्रकारच्या सोयीसाठी परिपूर्ण असताना जनतेला मूर्ख बनविण्यासाठी वरील केविलवाणा प्रयोग केला असल्याची चर्चा भिवापूर परिसरात सुरू आहे तरी संबंधित स्थानिक पातळीवरील लोक प्रतिनिधी नी याकडे विशेष लक्ष देवून ट्रामा हेल्थकेअर सेंटर जनतेच्या भावना लक्षात घेवून उपचारासाठी सुरू करण्यात
यावे अशी परिसरातील जनतेची जोरात चर्चा आहे.