logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

२९ एप्रिलला भंडाऱ्यात व्हॉइस ऑफ मीडियाचा पदग्रहण सोहळा व पत्रकार कार्यशाळेचे आयोजन

समीर नवाज भंडारा,
भंडारा- व्हॉइस ऑफ मीडिया भंडारा जिल्हा यांच्या वतीने जिल्हा व तालुका कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा तसेच पत्रकार कार्यशाळेचे आयोजन बुधवार दिनांक २९ एप्रिल २०२६ ला दुपारी १२ वाजता साई प्लाझा हॉटेल, भंडारा येथे करण्यात आले आहे.
या सोहळ्याला जिल्हाधिकारी श्री. सावनकुमार, पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन व समाज कल्याणच्या सहायक आयुक्त सौ. आशा कवाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. व्हॉइस ऑफ मीडियाचे संचालक श्री. किशोर करंजेकर, कार्याध्यक्ष श्री. नरेंद्र देशमुख प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमात नवनियुक्त जिल्हा व तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा होणार असून त्यानंतर पत्रकारांसाठी विशेष कार्यशाळा घेतली जाईल. बदलत्या काळातील पत्रकारितेची आव्हाने, डिजिटल मीडियाचा प्रभाव व पत्रकारांचे हक्क-जबाबदाऱ्या या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुका व शहरातील पत्रकार बंधूंना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनजिल्हाध्यक्ष शशिकांत भोयर यांनी केले आहे.

11
455 views

Comment