logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नीरा भीमा कारखान्याच्या तज्ञ संचालकपदी उदयसिंह पाटील, शिवाजी हांगे यांची निवड...

नीरा भीमा कारखान्याच्या तज्ञ संचालकपदी उदयसिंह पाटील, शिवाजी हांगे यांची निवड...

इंदापूर : प्रतिनिधी दि.26/4/2026
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालकपदी निवडीबद्दल उदयसिंह विलासराव पाटील व शिवाजी सादबा हांगे यांचा कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भागश्री पाटील यांच्या हस्ते संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये शुक्रवारी (दि. 25) सत्कार करण्यात आला.
नूतन तज्ञ संचालक उदयसिंह पाटील हे दूधगंगा दूध संघाचे माजी अध्यक्ष असून यापूर्वी निरा भिमा कारखान्याचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. तर शिवाजी हांगे हे भोडणी गावचे अनेक वर्ष सरपंच होते तसेच त्यांनी नीरा भीमा कारखान्याचे संचालक म्हणूनही काम केलेले आहे. या सत्कार प्रसंगी उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अँड.कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ उपस्थित होते.
_____________________________
फोटो:-निरा भीमा कारखान्याच्या तज्ञ संचालकपदी निवडीबद्दल हर्षवर्धन पाटील व अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते उदयसिंह पाटील यांचा शनिवारी सत्कार करण्यात आला.

0
0 views

Comment