logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भिगवणमध्ये कपडे वाळत घालण्याच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला...

भिगवणमध्ये कपडे वाळत घालण्याच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला...

गॅलरीत वाळत घातलेल्या कपड्यांचे पाणी अंगावर पडल्याच्या किरकोळ वादातून एका व्यक्तीवर लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना भिगवण येथे घडली आहे. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यश धनाजी जमदाडे (वय २२) आणि आरोपी विक्रम माडगे हे भिगवण येथील मंगलदृष्टी अपार्टमेंटमध्ये शेजारी राहतात. २६ एप्रिल रोजी रात्री ८:४५ च्या सुमारास, गॅलरीतील कपड्यांचे पाणी अंगावर पडल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाले.

शाम गार्डनकडे जाणाऱ्या रोडवरील पारस किराणा दुकासमोर आरोपींनी फिर्यादीचे वडील धनाजी जमदाडे यांना अडवले. यावेळी "याला जिवंत ठेवायचे नाही, तुम्ही याला मारून टाका, कितीही पैसे लागले तरी मी तुम्हाला बाहेर काढते," असे चिथावणीखोर वक्तव्य आरोपी रूपाली माडगे हिने केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

रूपाली माडगे हिच्या चिथावणीनंतर, मुख्य आरोपी विक्रम बाळासो माडगे आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी लोखंडी कोयत्याने धनाजी जमदाडे यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यात आणि डाव्या कानावर गंभीर जखमा झाल्या आहेत. दोन्ही हातांवर आणि पायाच्या नडगीवर वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून भिगवण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि इतर कायद्यांनुसार गुन्हा नोंदवला आहे: BNS कलमे: १०९ (खुनाचा प्रयत्न), ११८(२), ४९, ३(५). शस्त्र अधिनियम: कलम ४, २७. ॲट्रॉसिटी ॲक्ट: अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची विविध कलमे. नागरी हक्क संरक्षण अधिनियम: कलम ७ (१)(d).

सदर गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीणचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड हे स्वतः करत आहेत. या घटनेतील दोन अनोळखी इसमांचा शोध सुरू असून, भिगवण पोलीस अधिक तपास करत आहेत.

**टिप:** सदर बातमी पोलीस सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीवर (FIR) आधारित आहे. आरोपींविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

0
0 views

Comment