अमळनेर व पारोळ्यात लाच घेणाऱ्या तिघांना अटक
अमळनेर/पारोळा : लाचलुचपत
यात प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अमळनेर व पारोळा येथे केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत तीन जणांना अटक केली. अमळनेर येथील तहसीलदारांच्या नावे ५० हजाराची लाच मागणारे दोन जण आणि पारोळा येथील कुटीर रुग्णालयातील सहाय्यक अधीक्षकाचा समावेश आहे. दरम्यान, अमळनेर प्रकरणात तहसीलदार
रुपेशकुमार सुराणा यांचीही चौकशी करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये रामराव हरचंद पाटील (६४, रा. लोण पंचम, ता. अमळनेर) आणि जितेंद राजेंद्र पाटील (२६, रा. झाडी ता. अमळनेर) आणि पारोळा कुटीर रुग्णालय सहाय्यक अधीक्षक विजय प्रकाश वाघ (४२, रा. धुळे) या तीन जणांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त केलेले वाळूचे ट्रॅक्टर सोडविण्यसाठी वरील दोघांनी संबंधिताकडून अमळनेर तहसीलदारांच्या नावाने ५० हजाराची लाच मागितली. मंगळवारी जितेंद्र पाटील
पारोळा येथील कारवाई
पारोळा कुटीर रुग्णालयात अनुकंपा तत्त्वावरील स्वीपर कामगारांना स्थायी स्वरूपात कामाची परवानगी देण्यासाठी सहाय्यक अधीक्षक विजय वाघ याला दोन हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. मंगळवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
तहसीलदारांची चौकशी
अमळनेर येथील लाचप्रकरणी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धुळे येथे बोलावून चौकशी केली. तासभर चौकशीनंतर त्यांना घरी जाऊ देण्यात आले.
यास २५ हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली; त्याचा साथीदार रामराव यालाही नंतर पकडण्यात आले.