logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पोलीस कस्टडीतील मृत्यू की खून? केज पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी तीव्र

पोलीस कस्टडीतील मृत्यू की खून? केज पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी तीव्र

बीड प्रतिनिधी – केज पोलीस स्टेशन आधीच राज्यभर चर्चेत असताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केज तालुक्यातील तरुण आशिष धिवार यांचा पोलीस कस्टडीमध्ये झालेल्या कथित मारहाणीमुळे बीड जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, हा मृत्यू नसून थेट खून असल्याचा आरोप होत आहे.

रिपब्लिकन सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम वीर यांनी कठोर भूमिका घेत, “केज पोलिसांवर तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करावा,” अशी जोरदार मागणी केली आहे. “हा साधा मृत्यू नाही, तर पोलीस अत्याचाराचा परिणाम आहे. दोषींना वाचवण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, मयत आशिष धिवार यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असून, न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “आधी गुन्हा दाखल करा, मगच अंत्यसंस्कार,” अशी त्यांची ठाम भूमिका आहे.

याशिवाय,

कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी

पोस्टमार्टम इन-कॅमेरा पद्धतीने, बाहेरील जिल्ह्यातील डॉक्टरांकडून करण्याची मागणी
हीही पुढे करण्यात आली आहे.


या घटनेची दखल घेत, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर लवकरच केज येथे भेट देणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे केज पोलिसांविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आता प्रशासन या गंभीर आरोपांवर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

5
145 views

Comment