logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शेवगाव पोलिसांची मोठी कारवाई: खाटीक गल्लीतील कत्तलखान्यावर छापा, १७० किलो गोमांस जप्त

शेवगाव (प्रतिनिधी):
शेवगाव शहरात अवैध कत्तलखान्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली असून, आज सकाळी खाटीक गल्ली परिसरात केलेल्या कारवाईत १७० किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आज दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना खाटीक गल्लीतील एका घरात गोवंश जनावरांच्या मांसाची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. माहिती मिळताच मुटकुळे यांनी तातडीने तपास पथक तयार करून दोन पंचांसह खासगी वाहनाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.
पोलिसांनी खाटीक गल्लीतील रहिवासी आय्याज उस्मान कुरेशी (वय ४२ वर्ष) याच्या घरावर छापा टाकला असता, घराशेजारील मोकळ्या जागेत गोमांस आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
• १७० किलो गोमांस: (किंमत अंदाजे ३४,००० रुपये)
• साहित्य: एक तराजू काटा, दोन धारदार चाकू आणि लोखंडी मापे.
जप्त केलेल्या मांसापैकी २०० ग्रॅम नमुना रासायनिक तपासणीसाठी सीलबंद करण्यात आला असून, उर्वरित मांसाचा पंचासमक्ष नाश करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल शिवाजी आठरे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३२५ आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ च्या विविध कलमान्वये (गु.र.नं. ३११/२०२६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पीएसआय बाजीराव सानप, शाम गुंजाळ, भगवान सानप, राहुल आठरे, सचिन पिरगळ, ईश्वर बेरड आणि राजू बडे यांचा सहभाग होता.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आजिनाथ खेडकर करत आहेत.

39
1982 views

Comment