logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांसाठी पर्यावरणपूरक आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जालना ते अंबड या मार्गावर इलेक्ट्रिक मिडी

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांसाठी पर्यावरणपूरक आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जालना ते अंबड या मार्गावर इलेक्ट्रिक मिडी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या बसचा क्रमांक MH-49 BZ-7839 असून, ही सेवा प्रवाशांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
इलेक्ट्रिक बसमुळे इंधनाची बचत होऊन प्रदूषणात घट होणार असून, शांत व आरामदायी प्रवासाचा अनुभव प्रवाशांना मिळत आहे. या बसमध्ये आधुनिक आसनव्यवस्था, कमी आवाज आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे.
जालना-अंबड मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून या सेवेचे स्वागत करण्यात येत असून, भविष्यात अशा प्रकारच्या अधिक इलेक्ट्रिक बस सुरू करण्याची मागणीही होत आहे.
एस.टी. महामंडळाचा हा उपक्रम पर्यावरण संवर्धन आणि आधुनिक वाहतूक व्यवस्थेकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. 🚍🌱

0
255 views

Comment