logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ

छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ परिसरातील अनेक गरजू विद्यार्थ्यांनी घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देणे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदत करणे या उद्देशाने करण्यात आले होते. समाजसेवक प्रमोद दादा कदम, संघटना प्रमुख तुषार शेलार आणि उपसंघटनाप्रमुख तानाजी भाऊ किर्दत यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी म्हणाले, “विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रगती करावी आणि कोणत्याही अडचणीमुळे त्यांचे शिक्षण खंडित होऊ नये, हा आमचा मुख्य हेतू आहे. भविष्यातही अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जातील.”
या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले

1
163 views

Comment