logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

तरुणाने मैत्रिणीचे घरच जाळले एकतर्फी प्रेमात लग्नास नकार

शहापूर /साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
एकतर्फी प्रेमातून २५ वर्षीय मुलाने त्याच्या मैत्रिणीचे घरच जाळल्याचा प्रकार वागळे इस्टेट भागात उघडकीस आला आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

वागळे इस्टेट येथील अंबिकानगर परिसरात ही घटना घडली. २० वर्षीय तरुणी तिची आई, वडिल आणि ११ वर्षाच्या लहान भावासोबत भाड्याच्या खोलीत वास्तव्यास आहेत. तसेच एका महाविद्यालयात बी.काॅम. या अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहे. याच भागात राहणाऱ्या एका तरुणासोबत तिची ओळख होती. सुमारे पाच वर्षांपूर्वी त्याने मुलीला प्रेम असल्याचे सांगितले.तरुणीने त्यावेळी त्यास नकार दिला होता. परंतु तिने त्याच्यासोबतची मैत्री तोडली नव्हती. जानेवारी २०२६ पासून त्या तरुणाने तिच्याकडे लग्नाची मागणी केली. त्यास तरुणीने विरोध केला. तरुणाने वारंवार तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे तरुणीने तिच्या आई-वडिलांना याबाबतची माहिती दिली. सुमारे महिन्याभरापूर्वी तरुणीच्या आईने त्या तरुणाच्या घरी जाऊन तरुणाला आणि त्याच्या आईला याबाबत जाब विचारला. तसेच तरुणाला पुन्हा असे करु नकोस म्हणून समज दिली होती.

लग्नास नकार घराला आग…
२४ एप्रिलला रात्री ८ वाजताच्या सुमारास तरुण हा त्याच्या आई, बहिण आणि इतर काही नातेवाईकांना घेऊन तरुणीच्या घराबाहेर आला होता. तरुणी आणि तिची आई घराबाहेर आले असता, लग्नास नकार का दिला, असे म्हणत त्याने तरुणीला शिवीगाळ आणि मारहाण केली. तरुणाची आई आणि बहिणीने देखील त्यानंतर मारहाण सुरु केली. तरुणीच्या आई-वडिलांनी हे प्रकरण सोडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही तरुणाने शिवीगाळ केली. याप्रकारानंतर तरुणीचे आई-वडिल पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास निघाले होते. त्याचवेळी तरुणाने प्लास्टिकच्या बाटलीमध्ये भरलेले ज्वलनशील पदार्थ आणले. त्यानंतर त्याने तरुणीच्या दारात ते ओतून आगपेटीच्या साहाय्याने घराजवळ आग लावली. घटनेनंतर तरुणीच्या वडिलांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास संपर्क साधला. परंतु तरुण आणि त्याचे नातेवाईक तेथून पळून गेले. शेजाऱ्यांनी त्यांच्या दारासमोरील आगीवर नियंत्रण मिळविले. याप्रकरणी तरुणीने वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ चे कलम ११५ (२), ३(५), ३२६ (ग), ३५१, ४५२, ७८ (२) याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

24
741 views

Comment