logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

दैनिक सिटीझनचा १३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार

दैनिक सिटीझनचा १३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार

बीड : पत्रकारिता क्षेत्रात विश्वासार्हता आणि निष्पक्षतेची भक्कम ओळख निर्माण करणाऱ्या दैनिक सिटीझनचा १३ वा वर्धापन दिन सोहळा यंदा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. गेल्या तेरा वर्षांपासून जनतेच्या समस्या मांडत, सत्याला प्राधान्य देत आणि निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात आपले स्थान निर्माण करणाऱ्या या वृत्तपत्राच्या यशस्वी वाटचालीचा गौरव करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा वर्धापन दिन सोहळा १ मे (शुक्रवार) रोजी सायंकाळी ७ वाजता सिटीजन भवन, बीएसएनएल टॉवर समोर, बशीरगंज चौक, बीड येथे पार पडणार आहे. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दैनिक सिटीझनचे संपादक शेख मुजीब यांनी सर्व नागरिकांना मनापासून आवाहन केले आहे की, या विशेष सोहळ्यास सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. “आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी प्रेरणा आहे,” असे त्यांनी नमूद केले.
दैनिक सिटीझनच्या १३ वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा उत्सव साजरा करताना, भविष्यातही जनतेच्या हितासाठी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कार्य करण्याचा दृढ संकल्प यावेळी व्यक्त करण्यात येणार आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

5
289 views

Comment