logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शिराढोणमध्ये तरुण नेतृत्वाची नवी पहाट : अमोल माकोडे प्रभारी सरपंचपदी विराजमान

शिराढोणमध्ये तरुण नेतृत्वाची नवी पहाट : अमोल माकोडे प्रभारी सरपंचपदी विराजमान

शिराढोण ग्रामपंचायतीत नव्या नेतृत्वाचा उदय होत असून, उपसरपंच अमोल माकोडे यांची प्रभारी सरपंचपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान सरपंच लक्ष्मी म्हेत्रे या अपात्र ठरल्याने पद रिक्त झाले होते. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या कारभाराची धुरा आता अमोल माकोडे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
अमोल माकोडे यांच्या नियुक्तीने गावात उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तरुण, ऊर्जावान आणि कार्यक्षम नेतृत्व गावाला लाभल्याने ग्रामस्थांमध्ये आशावाद वाढला आहे. विकासाच्या नव्या वाटा खुल्या होतील, तसेच गावातील प्रलंबित प्रश्नांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार अमोल माकोडे यांनी व्यक्त केला आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, शिक्षण आणि युवकांना संधी उपलब्ध करून देणे या मुद्द्यांवर विशेष भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
तरुण नेतृत्वाच्या या नव्या अध्यायामुळे शिराढोण गाव प्रगतीच्या दिशेने आणखी वेगाने वाटचाल करेल, अशी खात्री ग्रामस्थांना वाटत आहे. गावाच्या भविष्याला नवी दिशा देणारा हा निर्णय ठरेल, अशीच सर्वांची अपेक्षा आहे. यावेळी माजी उपसरपंच अयुब भाई कुरेशी राजू भाई डांगे आकाश धाकतोडे सलमान बडे शेख शमीम खालेक कुरेशी तंटामुक्त अध्यक्ष अमोल नाईकवाडे नितीन पाटील डिके न्यूज संपादक दादाभाई खतीब एजाज डांगे जुबेर डांगे सलमान कुरेशी वसीम पठाण कुरेशी सर्फराज माझी ग्रामपंचायत सदस्य रफिक कुरेशी मुद्दु पटेल डांगे रियाज वसीम डांगे मुन्नाभाई आतार अशोक महाजन मुफ्ती जुबेर आदीपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

6
222 views

Comment