logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

टीव्ही पाहिला म्हणून कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न, नराधम बापाचा पत्नी, मुलगी आणि चिमुरड्या नातीवर चाकूने हल्ला

शहापूर साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
रात्री उशीरापर्यंत टीव्ही पाहिल्याने एका व्यक्तीने त्याची पत्नी, मुलगी आणि नात या तिघांवर चाकूने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशीरापर्यंत टीव्ही पाहण्यावरून अनेकांच्या घरात वाद होत असतील. पण हा वाद इतका टोकाला गेला की यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

राबोडी येथील अपनानगर परिसरात हा प्रकार उघडकीस आला. यातील तक्रारदार ही व्यक्तीची मुलगी असून ती विवाहित आहे. मुलींना शाळेला सुट्टी लागल्याने ती १७ एप्रिलपासून दोन्ही मुलींना घेऊन अपनानगर येथील तिच्या माहेरी आली होती. तिच्या वडिलांना क्षुल्लक कारणावरुन राग येत असतो. महिला ही तिची आई, वडिल, बहीण आणि दोन मुलींसोबत घरामध्ये असताना शनिवारी रात्री १२.१५ वाजेपर्यंत घरातील टीव्ही सुरु होता.काही वेळ टीव्ही बंद करण्यात आला. तिच्या एका मुलीचा वाढदिवस होता. तो साजरा करण्यात आला. त्यानंतर महिलेच्या बहिणीने मध्यरात्री १२.३० वाजता पुन्हा टीव्ही लावण्यास सांगितला. त्यास तिच्या वडिलांनी विरोध केला. मला झोपायचे आहे असे सांगत त्यांनी सर्वांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यास मुलीच्या आईने विरोध केला असता, तक्रादार हिच्या वडिलांनी रागाच्या भरात भाजी कापण्याची सुरी घेऊन पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यांना सोडवत असताना तक्रारदार हिच्यावर देखील हल्ला झाला. तिची मुलगी सोडविण्यास गेली असता, तिच्यावर देखील त्याने हल्ला केला. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

11
275 views

Comment